काही दिवसांपुरता कांदा होणार स्वस्त

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. २३ ऑक्टो – गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरांमध्ये तुफान वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्व सामान्यांच्या खिश्यांला कात्री बसत आहे. मात्र आता काही दिवसांपुरता कांद्याचे दर कमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. इराण, इराण, इराकमधील परदेशी कांद्याबरोबरच इंदोरमधूनही मुंबईकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक चांगल्या प्रकारे झाली आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे. ८० ते ८५ रूपयांवर गेलेल्या कांद्याचा दर ६० ते ७० रूपयांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे काही दिवसांकरता का होईना नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

आता कमी झालेले कांद्याचे दर काही दिवसांपूरता मर्यादीत राहणार असून पुन्हा कांद्याच्या दरात तेजी येणार आहे. असं व्यपारी वर्गाकडून सांगितले जात आहे. परतीच्या पावसामुळे कांद्याच्या किंमती वाढायला सुरूवात झाली. घाऊक बाजारात ८० ते ८५ रूपयांनी मिळणाऱ्या कांद्याचे दर किरकोळ बाजारात १०० रूपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.

दरम्यान, गुरूवारी घाऊक बाजारात ७६ गाड्या कांद्याची आवक झाली. गेल्या काही दिवसांपासून बाजारात दिवसाला फक्त ५० गाड्या येत होत्या. परिणामी कांद्याची आवक वाढल्यामुळे त्याचा कांद्याचे दर खाली येण्यास सुरूवात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *