अमेरिकेत जिओची 5 जी चाचणी यशस्वी

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. २३ ऑक्टो – अमेरिकन टेक्नॉलॉजी फर्म क्वालकॉमसोबत एकत्रित येत रिलायन्स जिओने अमेरिकेमध्ये आपल्या 5 जी टेक्नॉलॉजीचे परिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. अमेरिकेच्या सॅन डिएगोमध्ये झालेल्या एका व्हर्चुअल कार्यक्रमात परिक्षण करण्यात आले होते.

रिलायन्स जिओचे अध्यक्ष मॅथ्यू ओमान यांनी क्वालकॉम कार्यक्रमात क्वालकॉम आणि रिलायन्स एकत्रितपणे 5 जी टेक्नॉलॉजीवर काम करत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच लवकरच ही सुविधा भारतात सादर करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केले आहे.

जिओ आणि क्वालकॉम यांनी 2 जीबीपीएस स्पीड इंटरनेटची सुविधा ग्राहकांना देणार असल्याची घोषणा केली आहे. रिलायन्स जिओ 5 जीएनआर सोल्यूशंस आणि क्वालकॉम 5 जी आरएएन प्लॅटफॉर्मवर 1 जीबीपेसपेक्षा अधिक स्पीड मिळणार असल्याचे म्हटले आहे.

जगातील 5 जी स्पीड

सध्या जगभरातील अमेरिका, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, स्विर्त्झलँड आणि जर्मनी या सारख्या देशांच्या 5 जी ग्राहकांना 1 जीबीपेस इंटरनेट स्पीडची सुविधा मिळत आहे. यामुळे सदरची सुविधा लवकरच भारतात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

5 जी सेवेची तयारी

क्वालकॉमची जिओमध्ये 730 कोटींची गुंतवणूक केली जाणार
5 जी घोषणा जवळपास 3 महिन्याअगोदरची
15 जुलैला रिलायन्सच्या सर्वसाधारण सभेत 5 जी सेवेचे देण्यात आले संकेत
भारतात अजून 5 जी चाचणीसाठी स्पेक्ट्रम नाही उपलब्ध
विविध देशांकडून चीनच्या हुआईवर घालण्यात आले निर्बंध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *