दिलासादायक बातमी ! इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास पुन्हा मुदतवाढ

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. २५ऑक्टो – नवीदिल्ली : गेल्या आर्थिक वर्षातील इन्कमटॅक्स रिटर्न भरण्यास पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. २०१९-२०२०चा आयकर परतावा आता ३१ डिसेंबरपर्यंत फाईल करता येणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने जाहीर केले आहे.ज्या करदात्यांना आपल्या खात्यांचे ऑडिटिंग करावे लागणार आहे, अशांना ३१ जानेवारी २०२१पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मे महिन्यात सरकारने आयटी रिटर्नसाठीची मुदत ३१ जुलैवरून ३० नोव्हेंबर केली होती. आता पुन्हा एकदा लाखो करदात्यांना दिलासा मिळाला आहे.

लाखो वैयक्तिक करदात्यांना मोठा दिलासा देताना वित्त मंत्रालयाने शनिवारी थेट ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढविली आहे. ज्यांच्या खात्यांचे लेखापरीक्षण होणे आवश्यक आहे अशा करदात्यांसाठी आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारी २०२१ पर्यंत दोन महिन्यांनी वाढविण्यात आली आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने शनिवारी दिली. आयकर विवरणपत्र भरण्यासाठी करदात्यांना अधिक वेळ मिळावा यासाठी” मुदत वाढविण्यात आली असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे.

पगारदार वर्गासाठी आयटीआर दाखल करण्याची ३१ जुलैची शेवटची तारीख आहे. व्यावसायिक श्रेणीसाठी आयटीआर दाखल करण्याची ३१ ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. अशा प्रकारे पगाराच्या वर्गाला पाच महिन्यांची मुदतवाढ मिळाली तर व्यावसायिकांना दोन महिन्यांची मुदतवाढ मिळाली.

कर सवलत
थेट कर मुल्यांकन करण्याची मुदतही वाढविण्यात आली आहे. आता ते ३० सप्टेंबर ते ३१ डिसेंबर करण्यात आली आहे. टीडीएस, टीसीएस दर २५ टक्के कमी केले आहेत. यामुळे टीडीएस आणि टीसीएस भरणाऱ्यांना ५०,००० कोटी रुपयांचा दिलासा मिळणार आहे. विशेषत: वेतन नसलेल्या लोकांसाठी मोठा दिलासा मिळेल, म्हणजेच व्यावसायिकांना त्वरित परतावा दिला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *