मनसेच्या इशाऱ्यानंतर फ्लिपकार्ट अॅपमध्ये मराठी भाषेचा पर्याय देणार

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. २६ ऑक्टो – मुंबई :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इशाऱ्यानंतर अ‍ॅमेझॉनपाठोपाठ आता फ्लिपकार्टनेही अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यास मान्यता दिली आहे. मनसेला पत्र पाठवून मराठी भाषा लवकरच समाविष्ट केली जाईल, अशी फ्लिपकार्टनं शाश्वती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी ऑनलाइन शॉपिंगसाठी महत्त्वाची ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉनने अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश केला होता. मनसेने अ‍ॅमेझॉनला मनसेने इशारा दिल्यानंतर अ‍ॅमेझॉन इंडियाने नमते घेतले होते. कंपनीचे प्रतिनिधी आणि मनसे चिटणीस अखिल चित्रे यांच्यात बीकेसी कार्यालयात एक व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक झाली. त्यानंतर अ‍ॅमेझॉन मराठी भाषेचा समावेश करण्यासाठी तयार झाली. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करा, अन्यथा मनसे स्टाइलने आंदोलन करू, असा इशारा मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *