कोटक महिंद्रा बँकेने व्याजदर घटवले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. २६ ऑक्टो – मुंबई – उत्सवी काळासाठी बँका, वित्तसंस्था गृहकर्ज सवलतीत देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. उत्सवापूर्वी व्याजदर घटवण्याचा सिलसिला सुरू झाला असून आता कोटक महिंद्रा बँकेनेही व्याजदर घटवले आहेत. कोटक महिंद्रा बँकेने गृहकर्ज व्याजदरात कपातीचा निर्णय घेतला आहे. बँकेने गृहकर्ज व्याजदरात 10 बेसीस पॉइंटसने कपात केली असून नवा व्याजदर आता यापुढे 6.9 टक्के इतका असणार आहे. 21 ऑक्टोबरपासून नवा सुधारित गृहकर्जाच्या व्याजदराची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सणाच्या निमित्ताने बँकेने आकर्षक व्याजदर आकारण्याचे जाहीर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *