वर्दीतील स्त्रीशक्ती : पोलीस उपनिरीक्षक प्रिया गरुड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. २६ ऑक्टो – पुणे – नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव. कोरोनाच्या लढ्यात पोलीस दलातील स्त्रीशक्तीने कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय काम केले आहे.त्या स्त्री शक्तीचा सन्मान व गौरव करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न …शक्तीचे, बुद्धीचे, नीतीचे, भक्ती-शक्ती व कृषी संस्कृतीचे प्रतीक असणारे नवरात्रीचे मंगल पर्व सुरु असताना महाराष्ट्र पोलीस दलातील स्त्रीशक्तीच्या कार्याचा यथोचित गौरव करणे मला गरजेचे वाटते. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये स्त्रीशक्ती अनेक प्रकारे समाजाप्रती आपली बांधिलकी जपत आहेत. असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

पोलीस उपनिरीक्षक प्रिया गरुड

मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक प्रिया गरुड यांनी एका महिलेची फूटपाथवर प्रसूती झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन मोठ्या प्रयत्नांनी मातेसह बाळाला वेळेत रुग्णालयात दाखल केले. गरुड यांच्या समयसूचकतेमुळे आई आणि बाळ दोघेही आज सुरक्षित आहेत. कार्यतत्पर पोलीस उपनिरीक्षक प्रिया गरुड यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचा पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख या नात्याने मला अभिमान वाटतो.

नवरात्र उत्सवाचे पवित्र पर्व सुरु असताना महाराष्ट्र पोलीस दलातील असामान्य कार्य करणार्‍या स्त्री शक्तीची ओळख करुन देत असताना मला मनस्वी आनंद होत आहे असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *