महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २९ ऑक्टो – या फेस्टिव सीजनमध्ये अनेक नवीन कार लाँच करण्यात येणार आहेत. सर्वच ऑटोमोबाइल कंपन्या नवीन मॉडल्सला या दरम्यान बाजारात उतरवणार आहे. काही आपल्या मॉडल्सआधी लाँच करणार आहे. तर काही लवकरच भारतात आपली उत्पादन उतवरणार आहे. काही प्रोडक्ट्स लाँच करायला वेळ लागणार आहे. कंपन्या या कारला पुढील वर्षीपर्यंत बाजारात उतरवणार आहे.
टाटा ग्रॅव्हिटस
कंपनी पुढील वर्षीच्या सुरुवातीला ६ ते ७ सीटर एसयूव्ही घेवून येण्याची तयारी करीत आहे. ही कंपनीचे दुसरे मॉडल आहे. जे OMEGA प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे. ही कार टाटा हॅरियरचे जास्त मोठे व्हर्जन असणार आहे.
नवीन महिंद्रा XUV 500
महिंद्राची ही कार कंपीनी पुढील वर्षी बाजारात उतरवणार आहे. कारचे नवीन जनरेशन मॉडल मध्ये अनेक डिझाईन मध्ये बदल केलेले आहेत. कारमध्ये मर्सेडिज प्रमाणे इन्फोटेनमेंट सिस्टम मिळणार आहे.
नेक्स्ट जनरेशन मारुती सिलारियो
कंपनी या कारचे नवीन जनरेशन मॉडल घेवून येण्याची तयारी करीत आहे. कारचे नवीन मॉडल सध्याच्या मॉडलच्या तुलनेत जास्त मोठे आणि पॉवरफुल असणार आहे. या कारला पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत लाँच करणार आहे.