महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ३१ ऑक्टोबर – मुंबई – बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने कॅन्सरवर मात केल्यानंतर आता आपला लूक बदलला आहे. नेहमी हेअरस्टाईलवरून चर्चेत राहणाऱ्या संजयने आतादेखील आपली हेअर स्टाईल चेंज केली आहे. यामध्ये तो खूप कूल दिसत आहे. संजय दत्तच्या बदलल्या लूकचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संजय दत्तचा नवा लूक फॅन्सना आवडला आहे.
संजय दत्तचा हेअर स्टायलिस्ट आलिम हकीमने इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटोज शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये त्याचा लूक बदललेला दिसत आहे. फोटोजमध्ये दिसत आहे की, संजय दत्तने आपल्या केसांना प्लॅटिनम बोल्ड कलर केलं आहे. ब्ल्यू टी-शर्ट आणि चष्मा घालून संजय दत्त वेगवेगळ्या पोझमध्ये दिसत आहे.
https://www.instagram.com/aalimhakim/?utm_source=ig_embed
संजय दत्तने फुफ्फुसाच्या कॅन्सरवर मात केली आहे. त्याने ही माहिती फॅन्सना देत एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने लिहिले होते, ‘मागील काही आठवडे माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी खूप कठीण होते. असं म्हणतात की, परमेश्वर कठीण लढाई लढण्यासाठी सर्वात मजबूत सैनिकालाच निवडतो. आज, माझ्या मुलांच्या वाढदिनी मी ही लढाई जिंकून परतलो आहे. कुटुंबासाठी हे सर्वात मोठं गिफ्ट आहे.’
संजय पोस्टमध्ये लिहितो की, हे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकत नव्हते. आपण लोकांनी जे मला समर्थन दिले आहे आण प्रार्थना केल्या आहेत, त्याबद्दल मी आभारी आहे. कुटुंब, मित्र आणि चाहत्यांचे आभार मानतो. ते माझ्यासोबत या लढाईत उभे आहेत. प्रेम, आत्मीयता आणि अगणित प्रार्थनेसाठी धन्यवाद. मी डॉ. सेवंति आणि त्यांच्या टीमचा आभारी आहे. कोकिलाबेन रुग्णालयातील नर्स आणि मेडिकल स्टाफचा आभारी आहे, ज्यांनी माझी देखभाल केली.