महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. 1 -पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अण्णासाहेब बनसोडे यांच्या सहकार्याने दापोडी भागातील 200 दिव्यांगना गहू, तांदूळ, पोहे, लाल तिखट, कांदा लसून मसाला,मास्क, सॅनिटायझर आणि डेटॉल साबण चे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग चे पूर्णतः पालन करून आई उद्यान दापोडी येथे पार पडला. यावेळी राष्ट्रवादी अपंग सेल चे शहर उपाध्यक्ष श्री आनंद बनसोडे , श्री बाळासाहेब तरस, रवी भिसे ,नागेश काळे,योगेश सोनार आणि दिव्यांग बांधव व भगिनी उपस्थित होत्या.