महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २ नोव्हेंबर : .पुणे: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
‘आयसीएआय’ने जुलै महिन्यात होणाऱ्या सीए फाऊंडेशन, इंटरमिजिएट व फायनल या तिन्ही परीक्षा कोरोनामुळे थेट नोव्हेंबर महिन्यात होतील असे यापूर्वी स्पष्ट केले होते. या परीक्षा पुढे ढकलल्या असल्या तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याकडे लक्ष दिले.
दरम्यान, या परीक्षा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार होत्या. मात्र कोरोनाचा प्रभाव व बिहार विधानसभा निवडणूकीमुळे पुन्हा एकदा तारखा पुढे ढकलण्यात आल्या. अखेर ही परीक्षा २१ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत होणार आहेत. त्यासाठीचे प्रवेशपत्र आजपासून ‘आयसीएआय’ने उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांनी यासाठी www.icai.org या संकेतस्थळावर लाॅगइन करावे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा सुरक्षित पार पाडण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले जाणार आहे. यंदा केवळ दुपारी दोन वाजताच्या सत्रातच ही परीक्षा होणार आहे.
