दिवाळीनंतर महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ? आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ३ नोव्हेंबर – मुंबई -कोरोनाच्या रुग्णसंख्येचा (Coronavirus in Maharashtra) आलेख राज्यात कमी होत आहे. त्यामुळे थोडा दिला मिळाला आहे. मात्र दिवाळीनंतर कोरोनाची महाराष्ट्रात दुसरी लाट (Corona Second wave) येणार येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister) यांनी यावर सोमवारी(02 नोव्हेंबर) आपली भूमिका स्पष्ट केली. टोपे म्हणाले काही तज्ज्ञ अशा प्रकारची शक्यता व्यक्त करत आहे. अशा कुठल्याही लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे. सरकारने तयार केलेला टास्क फोर्स याबाबात अभ्यास करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दिवाळीमुळे होणारी गर्दी आणि आलेला हिवाळा यामुळे दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकार सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत असून आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यात मंदिरं सुरू करण्याची मागणी होत आहे, त्यावर बोलताना टोपे म्हणाले, याबाबत अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री सगळ्यांशी चर्चा करून घेतील. दिवाळीनंतर त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

गेल्या आठ महिन्यातल्या कोरोनाविरुद्धच्या लढाईचा अनुभव आता सरकारकडे असून त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आहे. आरोग्य यंत्रणाही आता सक्षम झाल्याचं ते म्हणाले.दरम्यान, मुंबईतल्या (Mumbai) कोरोना स्थितीचा Tata Institute of Fundamental Research म्हणजेच TIFRने अभ्यास केला आहे. त्या अभ्यासातले निष्कर्ष आता पुढे आले असून मुंबई पुन्हा एका कोरोनाची लाट येवू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जुलै ते सप्टेबर या महिन्यांमध्ये ज्या प्रमाणे कोरोनाबाधितांची संख्या वाढली तशीच संख्या पुन्हा एकदा वाढू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.26 ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीचा अभ्यास करून TIFRच्या अहवालात म्हटलं आहे की मुंबईत झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी 80 टक्के तर सोसायट्यांमध्ये राहणारे 55 टक्के लोक हे जानेवारीपर्यंत कोरोनाबाधीत होऊ शकतात. त्याचबरोबर 3 ते 4 महिन्यांमध्ये मुंबईत हर्ड इम्युनिटी तयार होऊ शकते असा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *