महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ८ नोव्हेंबर – मुंबई – रिपब्लिक ग्रुपचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी यांनी अजून काही दिवस तुरुंगात रहावे लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात अर्णबच्या जामीन याचिकेवर शनिवारी 6 तास सुनावणी झाली. न्यायालयाने आपला निकाल राखीव ठेवला.
दरम्यान कोर्टाने निकाल देण्यासाठी कोणतीही तारीख दिली नाही, लवकरच निर्णय दिला जाईल एवढेच सांगितले. सोबतच अर्णब यांची इच्छा असेल तर ते लोअर कोर्टात याचिका दाखल करू शकतील अशी सुटही दिली. तसेच अर्णबने याचिका दाखल केल्यानंतर 4 दिवसांत निर्णय द्यावा असे उच्च न्यायालयाने लोअर कोर्टाला निर्देश दिले.
अर्णबच्या वकिलांनी आज न्यायालयात पूरक अर्ज दाखल केला. यामध्ये अर्णबने दावा केली की पोलिसांनी त्यांना बुटाने मारहाण केली. पाणी सुद्धा पिऊ दिले नाही. त्याच्या हातात 6 इंच खोल जखमा, पाठीचा कणा दुखापतीचा दावाही अर्णबने केला आहे. अर्णब म्हणाले की, अटकेच्या वेळी पोलिसांनी बूट घालायलाही वेळ दिला नाही.
अर्णबला मुंबईच्या इंटेरियर डिझायनर अन्वय आणि त्यांच्या आईंच्या कथित आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासाठी अटक केले आहे. अर्णब 18 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे. कोरोनाचा धोका पाहता जामीन अर्जावरील अंतिम निर्णया आधी अर्णबला तुरुंगात पाठवण्यात आले नव्हते. गेले दोन दिवस अर्णबला कोविड सेंटरमध्ये अलिबागमधील एका शाळेत ठेवण्यात आले आहे.