मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू कृणाल पांड्याला मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात

Spread the love

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १३ नोव्हेंबर – मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याला मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे. तो आयपीएल हंगाम पूर्ण झाल्यानंतर दुबईवरून मुंबईत परतत होता. त्याला त्याच्याजवळ असलेल्या सोनं आणि किमती वस्तूंच्या चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मुंबई इंडियन्सने संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामावर आपले नाव कोरले. कृणाल पांड्या या संघाचा भाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *