विरोधी पक्षाचे काम फक्त सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत राहणे एवढच असते का?….राष्ट्रीय संकट असताना तरी विद्यमान सरकारला सहकार्य केले पाहिजे……..पि.के.महाजन.

Spread the love

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १३ नोव्हेंबर – :सत्ताधारी पक्षाप्रमाणेच विरोधी पक्षाचे लोकप्रतीनीधींना सुद्धा जनतेनेच निवडून दिलेले असतात, मात्र बहुमता अभावी ते विरोधी पक्षाचे बाकावर बसून विरोधी पक्षाचे कर्तव्य पार पाडीत असतात. सत्ताधारी पक्षाच्या कर्तव्य इतकेच विरोधी पक्षाचे कर्तव्य ही तितकेच महत्वाचे असते जितके सत्ताधारी पक्षाचे असते. सत्ताधारी पक्षाने सरकारची स्थापना करून देशाचा कारभार सांभाळण्याचे काम करायचे असते तर विरोधी पक्षाने चुकीच्या कामांना विरोध करायचा असतो.

पण आज कालचे संपूर्ण देशातील चित्र बघीतले तर उलटच दिसतय…….. विरोधी पक्ष देश हिताच्या कामांना पाठींबा देण्याऐवजी सरकार पाडण्यासाठीच जास्त मेहनत करतांना दिसतय. लोकहीतांच्या कामाऐवजी नको ते विषय उकरून काढने जेणेकरून सरकार कसे अडचणी येईल…..या ठिकाणी आपण कोणताही विरोधी पक्ष धरू या …….महाराष्ट्राच्या बाबतीत म्हटले तर राज्यात भाजपा+ सहकारीपक्ष विरोधीपक्षाचे काम करतात तर केंद्रात काँग्रेस+सहकारीपक्ष विरोधी पक्ष म्हणून काम करतात …थोडक्यात हा लेख कोणत्या ही पक्षाच्या बाजुने नाही हे लक्षात घ्यावे…..
खरे पाहता विरोधी पक्षाने देशाच्या विकासाची कामांना विरोध करायचा नसतो जे देशाच्या व देशातील जनतेच्या हिताची कामे असतात त्यांना पाठींबा द्यायचा असतो पण प्रत्यक्षात तसे घडतांना दिसत नाही…

. उलटपक्षी त्या कामांना विरोध दिसतोय कारण काय तर त्या कामाचे क्रेडिट सत्ताधारीपक्षाला जायलाच नको म्हणून विरोधासाठी विरोध केला जातो…..तसेच….विरोधी पक्षाने देश हिताच्या दृष्टीने एखादे अत्यावश्यक काम सुचवले तर त्या कामासाठी सत्ताधारी पक्ष फारसा रस दाखवत नाही जेणेकरून ते काम व्हायलाच नको कारण त्याचे क्रेडिट विरोधी पक्षाला जायला नको…..1996 मध्ये नरसींहरावाचे सरकार असताना नरसींहरावांनी विरोधी पक्षनेता माननीय अटल बिहारी वाजपेयींना देशाची भुमिका राष्ट्रीय संघाच्या परीषदेत मांडण्यासाठी जिनिव्हा येथे पाठवले होते, त्या वेळी त्यांनी विरोधी पक्ष नेता असून सुद्धा त्यांच्यावर विश्वास टाकला होता.

.जिनिव्हा मध्ये आपल्या देशाची भुमिका मांडण्यासाठी देशाच्या सत्ता धारी नेता ऐवजी विरोधी पक्षनेता आले आहेत हे पाहून तेथील इतर देशाचे प्रतिनिधी अवाक् झाले होते. खास करून पाकिस्तानचे प्रतिनिधी आश्चर्यचकरीत झाले होते कारण पाकिस्तानात विरोधी पक्ष हा सत्ताधारी पक्षाचे सरकार पाडण्यासाठीच काम करीत असतो,…थोडक्यात देश हिताच्या व जनतेच्या हितासाठी असलेल्या कामांबाबत सत्ताधारी व विरोधी पक्षाचे संबंध एकमेकांशी मिळते जुळते असायला हवेत. हल्ली ची परीस्थिती पाहता विरोधी पक्षाचे काम म्हणजे सरकार पाडणे एवढेच आहे असे दिसते.असे भारतात घडू नये हिच अपेक्षा……..पि.के.महाजन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *