कोरोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम : नितीन राऊत

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १९ नोव्हेंबर – कोरोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाल्याची कबूली ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विटर संदेशात दिली आहे. मात्र, यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजपा सरकारनं पुरेशी कार्यक्षमता न दाखवल्यानं आणि वीज बिलांची वसुली न केल्यानं महावितरणला यापूर्वीच सर्वात मोठा फटका बसला आहे असंही त्यांनी सांगितलं.

भाजपा सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी ५० हजार कोटींच्या जवळपास पोचल्याचं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. कोरोना महामारीच्या काळात वीज बिलं भरली न गेल्यामुळे महावितरणची थकबाकी नऊ हजार कोटींनी वाढून ऑक्टो्बरमध्ये ५९ हजार १०२ कोटींवर पोचल्याचं त्यांनी सांगितलं.

मार्च २०२० मध्ये घरगुती ग्राहकांकडे असलेली १ हजार ३७४ कोटींची थकबाकी ही ४ हजार ८२४ कोटींवर, वाणिज्य ग्राहकांची थकबाकी ८७९ कोटींवरून १ हजार २४१ कोटीपर्यंत तर औद्योगिक ग्राहकांची थकबाकी ४७२ कोटींवरून ९८२ कोटींवर पोहोचल्याचं त्यांनी एका अन्य ट्विटद्वारे सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *