महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १९ नोव्हेंबर – नवी दिल्लीःMi, Redmi आणि Poco स्मार्टफोन युजर्संना बूटलू समस्येचा सामना करावा लागत आहे. या समस्येमुळे त्यांचा स्मार्टफोन वारंवार रिस्टार्ट होत आहे. युजर्स मोठ्या संख्येने यासंबंधीची तक्रार करीत आहेत. फोन रिस्टार्ट झाल्यानंतर युजर्संना एरर मेसेज मिळत आहे. त्यावर लिहिले आहे Find Device closed unexpectedly. शाओमीकडून या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे.
शाओमीने याची गंभीर दखल घेतली असून लवकरच ही समस्या सोडवण्यात येईल असे स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून युजर्संनी आपली समस्या मांडली आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, MIUI 12.05 ग्लोबल स्टेबल रोमवर चालणाऱ्या फोनमध्ये ही समस्या येत आहे. ही समस्या येत असल्याने युजर्संना याचा चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार फोन रिस्टार्ट होत असल्याने अनेकांना कामात व्यत्यय येत आहे. अनेकांचे फोनवर बोलणे अर्धवट होत आहे. फोन वारंवार रिबूट होत आहे. काहींना आपला डेटा सुद्धा गमवावा लागत असल्याची तक्रार सोशल मीडियावरून युजर्स करीत आहेत.