‘अशा वातावरणात सलग राहणे फाइव्ह स्टार तुरुंगासारखे’ ; ऑस्ट्रेलियात जैवसुरक्षित वातावरणाला भारतीय क्रिकेटपटू कंटाळले,

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २२ नोव्हेंबर -भारतीय संघाचे खेळाडू सध्या सिडनीतील जैवसुरक्षित वातावरणात सराव करत आहेत. कोरोनामुळे संघांवर अनेक बंधने आहेत. ऑस्ट्रेलियात येण्यापूर्वी अनेक खेळाडू दुबईत आयपीएलदरम्यान तीन महिने जैवसुरक्षित वातावरणात होते. आता मात्र खेळाडू या वातावरणाला अत्यंत कंटाळले आहेत. त्याच्या मते, येथे राहणे फाइव्ह स्टार तुरुंगासारखे आहे. क्वॉरंटाइन नियमामुळे अनेक खेळाडू सलग मालिका खेळत नाहीत. कारण, आपल्या कुटुंबाला वेळ देता यावा. आयपीएलनंतर कर्णधार कोहलीनेदेखील त्यावर प्रश्न उपस्थित करत म्हटले, त्याच त्या गोष्टी कायम राहतात. भारत व ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात २७ नोव्हेंबरपासून होत आहे. पहिला वनडे सिडनीमध्ये होईल.

क्वॉरंटाइनमध्ये खेळाडूंवर कडक नियम लागू आहेत

> संघातील खेळाडूंना ने-आण करण्यासाठी चार मोठी वाहने करण्यात आली आहेत. प्रत्येक गाडीत १०-११ जण बसू शकतात.

> खेळाडूंना एकत्र बैठक करण्यास व एकत्र जेवण्यास मनाई आहे.

>हॉटेलमध्ये व्यायाम करू शकत नाहीत. हॉटेलच्या बाहेर आणि खोलीच्या बाहेरही पडता येत नाही.

रोहित शर्मा स्नायूच्या दुखण्यामुळे चर्चेत आहे. दुखापतीनंतरही आयपीएल खेळल्याने त्याच्या दुखापतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एनसीएमध्ये रिहॅब करत असलेल्या रोहितने म्हटले की, मला माहिती नाही काय सुरू होते. मात्र, मी दुखापतीबाबत बीसीसीआय व मुंबई इंडियन्ससोबत संपर्कात होतो. त्याने म्हटले, मी मुंबई इंडियन्सला सांगितले होते मैदानावर उतरू शकतो. कारण, ही छोट्या प्रकारची स्पर्धा आहे. मी परिस्थितीला हाताळू शकतो. आता मला स्नायूच्या दुखण्यातून आता बरे वाटते. मोठ्या प्रकारात खेळण्यापूर्वी स्वत:ला पूर्णपणे तंदुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *