कोरोनात शाळा: 8 महिन्यांनी घंटा वाजली, 35% शाळा सुरू

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २४ नोव्हेंबर – काेराेनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लाॅकडाऊन आणि अनलॉकच्याही काळात सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. राज्यात तब्बल आठ महिन्यांनी प्रथमच सोमवारपासून ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरू झाल्या. राज्यातील २५ हजारांहून जास्त शाळांपैकी सोमवारी फक्त ३५ टक्केच शाळा उघडल्या. विद्यार्थ्यांची उपस्थितीही अवघी ५ टक्के इतकीच राहिली. ग्रामीण भागातच बहुतांश शाळा उघडल्या होत्या. विद्यार्थी व शिक्षकांना प्रवेश देताना कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आल्याचे चित्र होते. विद्यार्थ्यांच्या अत्यल्प उपस्थितीने नागरिकांत आजही धास्ती असल्याचे स्पष्ट झाले.

महाराष्ट्रातील चित्र :

राज्यात एकूण २५ हजार ८६६ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा-महाविद्यालये आहेत. त्यात ५९ लाख २७ हजार ४५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, यापैकी केवळ ३६ टक्के शाळा साेमवारी उघडल्या गेल्या. २ लाख ९९ हजार १९३ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली.

मराठवाड्यातील स्थिती

मराठवाड्यात विद्यार्थ्यांची अत्यल्प हजेरी होती. उस्मानाबाद जिल्ह्यात ११,७३३ विद्यार्थी हजर होते. जालन्यात ५३६ शाळांपैकी ४०९, बीडमध्ये ७६८ पैकी २३६ शाळा व ७८ हजार विद्यार्थ्यांपैकी अडीच हजार विद्यार्थी शाळेत आले

.

येथील शाळा बंदच

मुंबई, नाशिक, नांदेड, परभणी, जळगाव, हिंगाेली, ठाणे, पालघर, धुळे, नागपूर ,हिंगोली या जिल्ह्यांतील शाळा बंदच ठेवल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *