२१ ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेले पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर अखेर सापडले

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २५ नोव्हेंबर – तब्बल एक महिन्यापासून बेपत्ता असलेले पुण्यातील प्रसिद्ध पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख गौतम पाषाणकर यांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. गौतम पाषाणकर २१ ऑक्टोबरला अचानक बेपत्ता झाले होते. गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर तपास सुरू असताना समोर आली होती. त्यांनी सुसाईड नोटमध्ये व्यवसायातील आर्थिक नुकसानीमुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. यानंतर पुणे शहरातील उद्योजक क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती.

गौतम पाषणाकर जयपूर येथे सापडले आहेत. ते बेपत्ता झाल्यानंतर पाषाणकर कुटुंबियांनी तक्रार दाखल केली होती. युनिट १ तेव्हापासून या प्रकरणाचा तपास करत होते. गौतम पाषाणकर राज्याबाहेर गेले असावेत अशी माहिती पोलीस निरीक्षक ताकवले यांना त्यांच्या सूत्रांकडून मिळाली होती. त्यादृष्टीने तपास सुरु होता. जयपूर येथील एका हॉटेलमध्ये गौतम पाषाणकर असल्याची माहिती युनिट १ क्राइम ब्रांचला मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यांना पुण्यात परत आणण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *