डिसेंबरपासून रेल्वेसेवा बंद ? रेल्वे मंत्रालय म्हणतं….

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २५ नोव्हेंबर – देशात मागील काही दिवसांपासून वाढणारा coronavirus कोरोना रुग्णांचा आकडा आणि त्या पार्श्वभूमीवर उचलली जाणारी पावलं पाहता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याच्या अनेक चर्चांनी जोर धरला. मुळात या चर्चांबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, या चर्चा मात्र अनेकांच्याच मनात भीती आणि असंख्य प्रश्न निर्माण करत आहेत. हे प्रश्न आहेत डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच रेल्वे सेवा बंद होणार का?

सोशल मीडियाच्या माध्यमातून या संदर्भातील काही मेसेजही व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा 1 डिसेंबरपासून विशेष रेल्वे गाड्यांसह इतरही रेल्वे बंद केल्या जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. ज्याबाबत आता खुद्द रेल्वे मंत्रालयाकडूनच महत्त्वाची माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या मेसेजची पडताळणी करत पीआयबी फॅक्ट चेकनं एक अत्यंत महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केली आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयानं 1 डिसेंबरनंतर रेल्वे सेवा बंद करण्यासंदर्भातील कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं आता स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळं सर्वसामान्यांच्या मनात असणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं यातून मिळाली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *