Google Pay पैशांचा व्यवहार करणाऱ्यांसाठी , आकारलं जाणार शुल्क;

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २५ नोव्हेंबर – गुगल पे’द्वारे (Google Pay) पैशांचा व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण, डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म Google Pay पुढील वर्षी जानेवारीपासून ‘वेब अ‍ॅप’वरील आपली ‘पीअर-टू-पीअर पेमेंट’ सुविधा (Peer to peer payments facility) बंद करण्याच्या तयारीत आहे. त्याऐवजी कंपनी एक नवीन ‘इंस्टंट मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टिम’ आणणार असून त्याचा वापर करण्यासाठी युजरकडे शुल्क आकारलं जाईल. मात्र, ही सेवा वापरण्यासाठी युजरला किती चार्ज आकारला जाईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

सध्या Google Pay मोबाइल किंवा pay.google.com वरुन मोफत पैशांचा व्यवहार करण्याची सुविधा देत आहे. पण, 9to5Google ने दिलेल्या वृत्तानुसार, गुगलकडून नोटीस जारी करुन WEB APP बंद करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे वर्ष 2021 च्या जानेवारीपासून युजर Pay.google अ‍ॅपद्वारे पैसे ट्रान्सफर करु शकणार नाहीत. यासाठी युजरला नवीन Google Pay चा वापर करावा लागेल. तसेच Google Pay चं सपोर्ट पेजही जानेवारीपासून बंद केलं जाईल, असं गुगलकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

जेव्हा युजर बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करतात, त्यावेळी पैसे ट्रान्सफर होण्यासाठी एक ते तीन दिवसांचा वेळ लागतो. तर, डेबिट कार्डने तात्काळ पेमेंट ट्रान्सफर होतं. डेबिट कार्डवरुन पैसे ट्रांसफर केल्यास 1.5% किंवा 0.31 डॉलर चार्ज आकारला जातो. अशात गुगलकडूनही इंस्टंट मनी ट्रांसफरसाठी शूल्क आकारलं जाऊ शकतं, असं कंपनीने सपोर्ट पेजवर नमूद केलं आहे. दरम्यान, गुगलकडून गेल्या आठवड्यात अनेक नवीन फिचर्स जारी करण्यात आलेत. ते सर्व फीचर अमेरिकी अँड्रॉइड आणि iOS युजरसाठी रोलआउट करण्यात आले आहेत. तसेच कंपनीने Google Pay च्या ‘लोगो’मध्येही बदल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *