केंद्र सरकारकडून ह्या मोबाइल अॅप्सवर बंदी, अनेक चायनीज अॅप्सचा समावेश

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २५ नोव्हेंबर – केंद्र सरकाराने मंगळवारी 43 मोबाइल अॅप्सवर बंदी घातली. केंद्राने इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी अॅक्ट 69A अंतर्गत ही कारवाई केली. या अॅप्समुळे भारताच्या सार्वभौमत्व, ऐक्य आणि सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. बंदी घातलेल्या 43 अॅप्समध्ये 14 डेटिंग, 8 गेमिंग, 6 बिझनेस/ फायनांस आणि एका एंटरटेनमेंट अॅपचा समावेश आहे. केंद्र सरकारने मागील 148 दिवसांत 267 अॅप्सवर बंदी घातली आहे.

टिकटॉकनंतर स्नॅक व्हिडिओवर अॅक्शन

चीनी अॅप टिकटॉकवर बंदी घातलेल्या केंद्र सरकारने आता पॉपुलर चॅट अॅप स्नॅक व्हिडिओवरही बंदी घातली आहे. हे सिंगापुर बेस्ड चायनीज सॉफ्टवेअर कंपनी आहे. या अॅपचे 10 कोटींपेक्षा जास्त यूजर्स आहेत. टिकटॉक बॅन झाल्यानंतर या अॅपचे अवघ्या 2 महीन्यात 5 कोटींपेक्षा जास्त यूजर्स झाले होते. यातील सर्वाधिक यूजर्स भारतातील होते.

केंद्राने 4 वेळा अॅप्सविरोधात कारवाई केली

सरकारने आतापर्यंत चारवेळा अॅप्सवर कारवाई केली आहे. पहिल्यांदा 29 जूनला 59 चीनी अॅप्स बॅन करण्यात आले होते. गलवानमध्ये झालेल्या हिंसक हाणामारीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. यानंतर 27 जुलैला 47 अॅप्स बंद करण्यात आले. लडाखमध्ये तणाव वाढल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यानंतर 2 सप्टेंबरला सरकारने पबजीसह 118 अॅप्स बॅन केले. त्यानंतर आता आज 24 नोव्हेंबरला परत एकदा सरकारने अॅप्सवर कारवाई केली आहे. केंद्राने हा निर्णय इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटरच्या गृह मंत्रालयला पाठवलेल्या रिपोर्टच्या आधारावर केला.

या 43 अॅप्सवर बंदी घालण्यात आली

1. अली सप्लायर्स

2. अली बाबा वर्कबेंच

3. अली एक्सप्रेस- स्मार्टर शॉपिंग, बेटर लिविंग

4. अलीपे कॅशियर

5. लालामोव इंडिया- डिलीवरी अॅप

6. ड्राइव विद लालामोव इंडिया

7. स्नॅक व्हिडिओ

8. कॅमकार्ड- बिजनेस कार्ड रीडर

9. कॅम कार्ड- BCR (वेस्टर्न)

10. सोल- फॉलो द सोल टु फाइंड यू

11. चायनीज सोशल- फ्री ऑनलाइन डेटिंग वीडियो अॅप अँड चॅट

12. डेट इन एशिया- डेटिंग अॅड चैट फॉर एशियन सिंगल्स

13. वी डेट- डेटिंग अॅप

14. फ्री डेटिंग अॅप- सिंगल, स्टार्ट योर डेट

15. एडोर अॅप

16. ट्रूली चायनीज- डेटिंग अॅप

17. ट्रूली एशियन- डेटिंग अॅप

18. चायना लव- डेटिंग अॅप फॉर चायनीज सिंगल्स

19. डेट माई एज- चॅट, मीट, डेट

20. एशियन डेट

21. फ्लर्ट विश

22. गाइज ओनली

23. ट्यूबिट

24. वी वर्क चायना

25. फर्स्ट लव लाइव – सुपर हॉट लाइव ब्यूटीज लाइव ऑनलाइन

26. रेला – लेस्बियन सोशल नेटवर्क

27. कॅशियर वॉलेट

28. मँगो टीवी

29. एमजी टीवी – ह्यूमन टीवी ऑफिशियल टीवी अॅप

30. वी टीवी – टीवी व्हर्जन

31. वी टीवी – सी ड्रामा के ड्रामा अँड मोर

32. वी टीवी लाइट

33. लकी लाइव- लाइव व्हिडिओ स्ट्रीमिंग अॅप

34. टाओवाओ लाइव्ह

35. डिंग टॉक

36. आइडेंटिटी वी

37 . आयसोलँड 2 : ऐशेज ऑफ टाइम

38. बॉक्सस्टार (अर्ली एक्सेस)

39. हीरोज इवोल्वड

40. हॅप्पी फिश

41. जेलिपॉप मॅच : डेकोरेट यूअर ड्रीम आइसलँड

42. मंचकिन मॅच : मॅजिक होम बिल्डिंग

43. कॉनक्विस्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *