रशियाची ‘स्पुतनिक व्ही’ लस 95 टक्के प्रभावी

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २५ नोव्हेंबर – मॉडर्ना, कोविशिल्ड आणि फायझर या लसीनंतर आता रशियाची ‘स्पुतनिक व्ही’ ही लस देखील 95 टक्के प्रभावी असल्याचे चाचण्यांमधून सिद्ध झाले आहे. रशियन आरोग्य मंत्रालयाकडून यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले.

गामलेया रिसर्च सेंटर आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थांनी मिळून ही लस तयार केली आहे. या लसीच्या एका डोसची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये 10 डॉलर्सपेक्षा कमी असेल. तर रशियाच्या नागरिकांसाठी ही मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

रशियाने सर्वात आधी ‘स्पुतनिक व्ही’ ही लस तयार करून कोरोनावर प्रभावी असल्याचा दावा केला होता. मात्र, त्याच्या क्लिनिकल ट्रायलवर शंका व्यक्त करण्यात आल्या होत्या. 42 दिवसांपूर्वी स्वयंसेवकांना देण्यात आलेल्या डोसनंतर हाती आलेल्या डेटाच्या आधारे ही लस 95 टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे सांगण्यात येते. जानेवारी 2021 मध्ये लसीची पहिली आंतरराष्ट्रीय डिलिव्हरी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *