महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २६ नोव्हेंबर – आर्थिक घोटाळा झाला आहे असा संशय आला तर ईडी ऐवजी आयकर विभागाने छापे टाकून कारवाई केली पाहिजे. निव्वळ आर्थिक घोटाळ्याचा तपास लावण्या साठी ईडी चा वापर करने म्हणजे आयकर विभागाचे काम ईडी ने केल्या सारखे वाटते. जर आर्थिक घोटाळ्याचा तपास लावण्या साठी ईडी काम करणार असेल तर ज्या ठिकाणी बँका डबघाईला जातात, जिथे जनतेला हक्का चा पैसा काढण्या वर मर्यादा येतात, त्या ठिकाणी बॅंकांवर , बॅकेंशी निगडीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वर म्हणजे आर्थिक घोटाळा करून चुकीचे व्यवहार करणारया जबाबदार अधिकारींवर ईडी का धाडी टाकत नाही?
जनतेच्या पैशांना किंमत नाही का? बॅंका च्या चुकांमुळे करोडो चे कर्ज बुडवून कर्ज बुडवे पसार होतात, हा पण एक आर्थिक घोटाळ्याचा च प्रकार आहे अशा ठिकाणी पण ईडी कारवाई करावी. एखादी बॅंक डबघाईला गेल्याची घोषणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च करते…ही घोषणा च आर्थिक घोटाळ्याचा सबळ पुरावा आहे, अशा गरजेच्या ठिकाणी ईडी ने आपल्या तपास यंत्रणेचे कौशल्य वापरून जनतेला न्याय मिळवून दिला तर कुठलाही गुन्ह्याचा तपास करणारी देशाची सर्वोच्च संस्था ईडी चा रूबाब टिकून राह शकतो…. .पि.के.महाजन.