महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २८ नोव्हेंबर – श्रीनगरमध्ये लष्कराच्या गस्ती पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव, (ता.चाळीसगाव) येथील जवान यश दिगंबर देशमुख शहीद झाले. त्यांच्यावर आज (ता.२८) त्यांच्या मुळ गावी अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण तयारी प्रशासनाने केली आहे.
त्यांचे पार्थिव आज सकाळी साडे आठ वाजता पिंपळगाव येथे पोहोचणार आहे. त्यानंतर अंदाजे दहाच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे भुसावळ येथील कर्नल करूण ओहरी यांनी सांगितले. यश देशमुख सप्टेंबर महिन्यात सुट्टीसाठी गावी आले होते. हीच त्यांची व गावकऱ्यांची व परिवाराची शेवटची भेट होती