ह्या ठिकाणी घराबाहेर पडताना मास्क लावला नाही तर होऊ शकतो 8 दिवस तुरुंगवास

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २८ नोव्हेंबर – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग अत्यावश्यक आहे हे वारंवार सांगूनही अनेक ठिकाणी मास्क घालण्यासाठी लोक टाळाटाळ करतात. प्रशासनानं 8 महिने सांगून देखील अद्यापही नागरिकांनी त्याकडे कानाडोळा केल्यानंतर आता काही कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी 500 रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंत मास्क न घातल्यास दंड आकारण्यात येत आहे.

आता केवळ दंडच नाही तर या देशात मास्क न घातल्यास 8 दिवसांसाठी कारवास देखील होऊ शकतो अशी माहिती मिळाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता सर्व स्तरातून काही कठोर पावलं उचलली जात आहे. हे. अशा परिस्थितीत हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यातही अटकेचे आदेश देण्यात आले आहेत.

सिरमौरच्या एसपींनी दिलेल्या माहितीनुसार मास्क न घालणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला विना वॉरंट अटक केली जाऊ शकते. दोषी आढळल्यास या व्यक्तीला 8 दिवसांपर्यंत कारावासाची देखील शिक्षा केली जाणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. 5000 रुपयांपर्यंत दंड किंवा तुरुंगवास अशी शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क विसरलात तर तुरुंगात जाण्याची किंवा 5000 रुपये भरण्याची तयारी ठेवायला हवी. एवढं सगळं करण्यापेक्षा नागरिकांनी नियमित मास्क घालावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी हिमाचल, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये काही कठोर नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू देखील लावण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्या याआधी 1000 रुपये दंडाची रक्कम भरावी लागत होती. मात्र ही रक्कम आता वाढवली असून 5000 रुपये करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *