अभिनेते आणि भाजपचे खासदार सनी देओल यांना कोरोनाची बाधा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २ डिसेंबर – बॉलिवूड अभिनेता आणि गुरदासपूरचे भाजप खासदार सनी देओल यांना कोरोनाची बाधा झाली आहे. हिमाचल प्रदेशचे आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी मंगळवारी रात्री उशीराने याबाबत माहिती दिली.

अधिक माहिती देताना आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी सांगितले की, जिल्हा मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार सनी देओल आणि त्यांचे मित्र 3 डिसेंबर रोजी मनालीवरुन मुंबईला परत जाणार होते. मुंबई जाण्याआधी त्यांनी आपली कोरोना टेस्ट केली. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, सनी देओल यांची नुकतीच मुंबईमध्ये खांद्याची सर्जरी झाली आहे. त्यानंतर काही दिवस आराम करण्यासाठी ते मनालीमधील आपल्या फार्म हाऊसवर गेले होते. मागील काही दिवसांपासून ते तिथेच थांबलेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *