महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ४ डिसेंबर – पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवली आहेत. महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते, भाजपचे संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची 73321 मतं मिळाली आहेत. तब्बल 48 हजार 824 मतांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी पहिल्या फेरीतच दणदणीत विजय मिळवला आहे. विजयानंतर अरुण लाड हे सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या मोदीबागेतील निवासस्थानी जाणार आहेत.
विजयानंतर अरुण लाड म्हणाले की, क्रांती अग्रणी जी. डी. लाड यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंती दिवशी हा विजय मिळाला आहे. चंद्रकांत पाटील यांनी माझा विजय सोपा केला. त्यांनी पदवीधरांसाठी काही कामच केलं नाही. त्यामुळे पदवीधरांनी मला कौल दिला. कॉंग्रेस आणि शिवसेनेची मदत झाली त्यामुळं विजय मोठा झाला, अशी प्रतिक्रिया लाड यांनी दिली.