सरकारसोबत ची पाचव्या फेरीची चर्चा फिस्कटली, दिल्ली सीमेवर मोठ्या संख्येने शेतकरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ६ डिसेंबर – शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यात पाचव्या फेरीची चर्चा (Farmers Government Fifth Meeting) सुरु होती. मात्र, यात तोडगा निघू न शकल्याने ही चर्चा फिस्कटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने कृषी कायदा २०२० मध्ये सुधारणा करण्यास सहमती दर्शविली आहे, परंतु शेतकरी त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. दरम्यान, मोठ्या संख्येने शेतकरी दिल्ली सीमेवर (Delhi Border) गोळा झाले आहेत. सरकारने दिल्ली पोलिसांना सीमेवर सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या १० दिवसांपासून शेतकरी सातत्याने आंदोलन (Farmers Protest) करत आहेत. सरकार आणि शेतकरी यांच्यात ही पाचवी फेरीतील बैठक आहे.

कृषी कायद्याविरोधात (Farm Laws) शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे (Farmers Protest) एनसीआर प्रदेशातील अनेक मार्ग बंद आहेत. दिल्ली-नोएडा लिंक रोडही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत एमएसपी आणि मंडी यावर चर्चा झाली आहे. परंतु हे तीनही कृषी कायदे रद्द करण्यावर शेतकरी ठाम आहे.

सरकार आणि शेतकरी यांच्यातील पाचव्या फेरीतील चर्चेदरम्यान शेतकरी नेते सरकारवर संतापलेले दिसत आहेत. शेतकरी नेते सरकारकडे मागण्यांबाबत निर्णय घेण्यास सांगत आहेत. शेतकऱ्यांनी बैठक सोडण्याबाबतही बोलले. या बैठकीत शेतकऱ्यांनी कॅनडाच्या पंतप्रधानांनी नवीन कृषी कायद्यांबाबत केलेल्या विधानाचा उल्लेखही केला. ते म्हणाले, कॅनडाची संसद चर्चा करीत आहे, पण आपले सरकार ऐकायला तयार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *