पेट्रोल-डिझेलचा किंमतीत वाढ : डिझेल ८० तर पेट्रोलने ९० चा टप्पा ओलांडला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ६ डिसेंबर – कोरोनाच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली होती. ही वाढ अद्यापही सुरु असून देशात आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली आहे. त्यात राज्यातील सात जिल्ह्यामध्ये डिझेलचे दर ८० रुपये पार गेले आहेत. तर १९ जिल्ह्यात पेट्रोलने ९०चा टप्पा ओलांडला आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी डिझेल-पेट्रोलच्या किंमती वाढल्याचे शुक्रवारी जाहीर करण्यात आले होचे. यामध्ये डिझेलच्या दरात १८ ते २० पैशांची वाढ झाली होती. तर पेट्रोलचे दर १५ ते १७ पैशांने वाढले होते. त्यात आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.

महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यांमध्ये पेट्रोल १९ पैशांनी वाढले असून आज पेट्रोलची किंमत ९०वर गेला आहे. तर डिझेलची किंमत २४ पैशांनी वाढली आहे. त्यामुळे डिझेल ७९.६६ रुपयांवर गेले आहे.
सात जिल्ह्यामध्ये डिझेलचे दरनागपूर, परभणी, नांदेड, सोलापूर, अमरावती, औरंगाबाद आणि बुलढाणा या जिल्ह्यात डिझेलची किंमत ८० रुपये आहे. तर परभणीत पेट्रोल दर सर्वाधिक म्हणजे ९१.९५ रुपये आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *