महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ७ डिसेंबर – रात्री राष्ट्रीय महामार्गावर पारा 13 अंशांपर्यंत उतरतो, तरीही जागाेजागी सुरू असलेले लंगर थांबत नाहीत . नव्या कृषी कायद्याच्या विरोधात ८ डिसेंबरला ऑल इंडिया किसान संघर्ष कोऑर्डिनेशन कमिटीने बंदचे आवाहन केले आहे. बंदला काँग्रेससह २० पक्ष व १० कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. शेतकरी नेते बलदेवसिंग निहालगड यांनी सांगितले, सायंकाळपर्यंत बंद असेल. दुपारी ३ पर्यंत चक्काजाम राहील. अॅम्ब्युलन्स व विवाहाच्या गाड्यांना मुभा असेल. पंजाबचे खेळाडू, कलाकारांनी सोमवारी पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे.