महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १४ डिसेंबर – :कोरोना लॉकडाऊनमुळे राज्य आर्थिक संकटात असताना दुरुस्तीच्या नावाखाली मंत्र्यांचे बंगले चकाचक केले जातायत. यासाठी तब्बल ९० कोटींचा खर्च केला जातोय अशी माहिती सुत्रांनी दिलीय. बंगल्याचे काम सुरु असताना महागड्या वस्तू वापराव्या असा दबाव मंत्री आणि त्यांचे पीए, पीएस आणतात असे दिसून आलंय. यावरुन विरोधी पक्ष भाजपने सरकारवर निशाणा साधलाय. कोरोना काळात राज्यावर आर्थिक ताण असताना जनतेच्या कराच्या पैशांतून अशाप्रकारची हौस पूर्ण करणं योग्य आहे का ? असा प्रश्न विचारला जातोय.
शेवटी सरकार कोणाचेही असो चूक ही चूक आहे. अशाप्रकारच्या खर्चांमध्ये ताळमेळ असावा. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर असे खर्च दुर्लक्षित होतात. हा अनावश्यक खर्च आहे. हा खर्च होऊ नये यासाठी भाजप भूमिका घेईल. हा खर्च जनतेच्या पैशातून होतोय. कोणाच्यातरी सांगण्यावरुन खर्च होतोय असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं. सरकारकडून यावर अद्याप कोणते स्पष्टीकरण आले नाही.