जिओ रियलमीच्या मदतीने स्वस्त स्मार्टफोन्स आणणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १५ डिसेंबर – :रिलायन्स जिओ येत्या काळात ग्राहकांना 5-जी सेवा देण्यासोबत अन्य डिजिटल प्लॅटफॉर्म सादर करण्याच्या तयारीत आहे. याचाच एक भाग म्हणून रिलायन्स स्वस्त स्मार्टफोन निर्मिती करण्यासाठी रियलमीसोबत हात मिळवणी करणार असल्याचे संकेत आहे. यासह अन्य कंपन्यांसोबत काम करणार असल्याचीही माहिती आहे.

इंडियन मोबाईल काँग्रेस 2020(आयएमसी) च्या कार्यक्रमात बोलताना रिलायन्स जिओचे डिव्हाईस ऍण्ड उपकरण मोबिलिटी विभागाचे अध्यक्ष सुनील दत्त यांनी, 2 जी हॅण्डसेट वापरणाऱयांना 4 जी किंवा 5 जी अपग्रेड करण्यासोबत स्वस्त उपकरणे उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. 5 जी नेटवर्क सेवेचा विस्तार करण्यावर येणाऱया काळात भर दिला जाईल. स्वस्त स्मार्टफोन्स सादर करण्यासाठी जियोचा प्रयत्न असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *