फी न भरलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद केले जात असल्याच्या तक्रारी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १९ डिसेंबर – शाळांकडून  सर्वच शुल्क वसूल केले जात आहे. याविरोधात सुरू असलेल्या पालक आणि संस्थाचालकांचा वाद आता विकोपाला जात आहेत. शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद केले जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.

कोरोनाकाळात अनेकांना नोकरी तसेच रोजगार गमवावा लागला. तर अनेक कंपन्यांनी कर्मचार्‍यांच्या वेतनामध्ये कमालीची कपात केली आहे. यामुळे अनेक पालकांना शाळांचे शुल्क भरणे शक्य होत नव्हते. यामुळे शाळांनी शुल्कवाढ करू नये तसेच शुल्कवसुलीसाठी पालकांकडे तगादा लावू नये, अशा सूचना सरकारने दिल्या होत्या. मात्र तरीही अनेक शाळांनी शुल्कवाढ केली. तर काही शाळांनी शुल्कवाढ केली नसली तरी कपातही केली नाही. शिवाय पालकांनी वेळेत शुल्क भरावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात होता. यानंतर संस्थाचालकांनी शुल्क मिळत नसल्याने संस्थेचे कामकाज चालविणे अवघड होत असल्याचे पालकांना सांगितले.

ऑनलाईन सेवाव्यतिरिक्‍त कोणत्याही सेवा मुलांना मिळत नसताना याबाबत पालकांनी आवाज उठवूनही शाळांनी शुल्क कपात केली नाही. सरकारनेही याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. पालकांना दाद मिळू शकली नाही.शुल्क भरण्याला पालकांचा वाढता विरोध लक्षात घेता संस्थाचालकांनी त्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा, शुल्कवसुली करण्यासाठी शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

सेवा नसताना लूट
ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने ग्रंथालय शुल्क, प्रयोगशाळा शुल्क, बस शुल्क आदी शुल्क वसुली करू नये असे पालकांचे म्हणणे होते. तरीही हे शुल्क आकारले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *