महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २२ डिसेंबर – देशभरात सलग १५ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा दर स्थिर आहेत. दुसरीकडे जागतिक बाजारात मात्र कच्च्या तेलाचा भाव ५० डॉलरवर कायम आहे.
मागील दोन आठवड्यात मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकात्यात पेट्रोल आणि डिझेलचा दर स्थिर आहे. आज मुंबईत पेट्रोलचा भाव एक लिटरसाठी ९०.३४ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.५१ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८३.७१ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.८७ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव ८६.५१ रुपये झाला असून डिझेल ७७.४४ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.१९ रुपये असून डिझेल ७७.४४ रुपये आहे.