फ्लिपकार्टवर २६ पासून इलेक्ट्रॉनिक्स २०२० सेल, स्मार्टफोन्सवर जबरदस्त सूट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २५ डिसेंबर -Flipkart ने नुकतेच आपली बिग सेविंग डेज सेलचे आयोजन केले होते. आता कंपनी आणखी एक ईयर एन्ड सेलचे आयोजन करीत आहे. नवीन सेलचे नाव फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स २०२० सेल आहे. या सेलची सुरुवात २६ डिसेंबर पासून होणार असू हा सेल २८ डिसेंबर पर्यंत चालणार आहे.

या सेल दरम्यान, ICICI बँक कार्ड धारकांना १० टक्के डिस्काउंट मिळणार आहे. तसेच एक्सचेंज ऑफर्सचा लाभ सुद्धा मिळणार आहे. फ्लिपकार्टने सर्व स्मार्टफोन्सच्या डील्सची माहिती दिली आहे. आम्ही काही स्मार्टफोन्सची यादी बनवली आहे. ज्यावर चांगला डिस्काउंट ग्राहकांना या सेलमध्ये मिळू शकतो. iPhone SE 2020 च्या ६४ जीबी व्हेरियंटचा फोन ३२ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. या वर्षीच्या सुरुवातीला या फोनला ४२ हजार ५०० रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. म्हणजेच फ्लिपकार्टवर हा फोन तुम्हाला ९ हजार ५०१ रुपयांच्या डिस्काउंट सोबत मिळू शकणार आहे. तसेच ग्राहकांना एक्सचेंज ऑफर अंतर्गत १३ हजार २०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकणार आहे.

या सेलमध्ये Realme X3 SuperZoom वर ग्राहकांना डिस्काउंटचा फायदा मिळणार आहे. ग्राहकांना या फोनवर ४ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. ग्राहकांना ४ हजारांच्या डिस्काउंटनंतर हा फोन २७ हजार ९९९ रुपयांच्या किंमती ऐवजी २३ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. हा फोन 120Hz डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन ८५५ प्लस प्रोसेसर सोबत येतो. फ्लिपकार्ट च्या Electronics 2020 सेल दरम्यान iPhone 11 Pro चे 64GB ७९ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध होणार आहे. सध्या ई-कॉमर्स प्लेटफॉर्म वर या iPhone ची विक्री ८४ हजार ९०० रुपयांच्या किंमतीत केली जात आहे. या सेलमध्ये या आयफोनवर ४ हजार ९०१ रुपयांचा डिस्काउंट ग्राहकांना मिळू शकणार आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत १३ हजार २०० रुपयांची सूट ग्राहकांना मिळू शकणार आहे.

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये iPhone XR ३८ हजार ९९९ रुपयांत मिळणार आहे. तसेच Realme 6 ला ११ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता येणार आहे. या फोनची सध्याची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. फ्लिपकार्ट ईयर एन्ड सेलमध्ये Galaxy Note 10+ चे 12GB + 256GB व्हेरियंट ५४ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *