महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २७ डिसेंबर – सांगवी : सध्याच्या स्पर्धेच्या युगात मराठी तरुणांनी व्यवसायात उतरावं, असं मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल.
नवी सांगवी येथील आदित्य सातव यांच्या युनिव्हर्सल फिटनेस क्लब या अत्याधुनिक जीमचे उदघाटन डॉ. कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी हिंद केसरी अमोल बराटे, डॉ. अमरसिंह निकम, आमदार अण्णा बनसोडे, नगरसेवक संदीप वाघेरे, अंबरनाथ कांबळे, मधवीताई राजापुरे, योगेश ससाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोना काळात आपली तब्बेत सांभाळणं सर्वात जास्त गरजेचं आहे. आणि अश्या काळात एक मराठी तरुण फिटनेसच्या व्यवसायात उतरतोय, याचा आनंद असल्याच्या भावना डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केल्या.