महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३० डिसेंबर – यूएस क्लिन एनर्जी अँड इलेक्ट्रिक व्हेइकल कंपनी टेस्ला भारतामध्ये 2021च्या सुरुवातीस आपले कामकाज सुरू करणार आहे, असे केंद्रीय परिवहन आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
यावेळी चर्चा करताना गडकरी यांनी देशातील इलेक्ट्रिकल कारच्या आवश्यकतेवर भाष्य केले. ते म्हणाले, अनेक भारतीय कंपन्या इलेक्ट्रिकल गाड्यांवर काम करत आहेत. ज्यांच्या गाड्यांची किंमती कमी होऊ शकते. मात्र, तांत्रिकदृष्ट्या टेस्ला फार प्रगत आहे. टेस्ला विक्रीबोरबर आपल्या कामकाजाला सुरुवात करेल. यानंतर कारच्या बाबतीत लोकांचा प्रतिसाद पाहून ते गाड्यांच्या असेम्बल आणि उत्पादनानंदर्भात विचार करतील. एवढेच नाही, तर पुढील पाच वर्षांत भारत क्रमांक एकचे मॅन्युफॅक्चरिंग हब होईल, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.
जगातील सर्वात व्हॅल्यूड ऑटोमोबाईल कॉर्पोरेशनने मार्केट कॅपनुसार पुढील महिन्यात बुकिंग पुन्हा सुरू करण्याचे आणि 2021-22 च्या पहिल्या तिमाहीच्या शेवटी डिलिव्हरी देण्याच्या योजनांना सील केले आहे. मस्कने ऑक्टोबर महिन्यात ट्विट केले होते, की 2021मध्ये टेस्ला भारतात लॉन्च होईल. टेस्लाचीदेखील देशात आर अँड डी सेंटर आणि बॅटरी उत्पादक कंपनी उघडण्याची योजना आहे. तथापि, कंपनीने 2016 मध्येच मॉडेल 3च्या प्री-बुकिंग सुरू करत भारतात प्रवेश करण्याची योजना केली होती.
