महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २ जानेवारी – नवी दिल्लीः वोडाफोन – आयडियाने नवीन वर्षात आपली ३ जीबी सिम सर्विसला आणखा एका शहरात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वोडाफोन-आयडिया १५ जानेवारी पासून दिल्लीतील ३ जी सर्विस बंद करणार आहे, कंपनीने अशी घोषणा केली आहे. १५ जानेवारी पर्यंत आपल्या ३ जी सिमला ४ जी मध्ये पोर्ट करून घ्या. नाही तर १५ जानेवारीपासून सेवा बंद केली जाणार आहे. त्यामुळे दिल्लीतील वोडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना नंबर पोर्ट करण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत वेळ आहे.
भारातत अनेक वर्षापासून ४ जी सर्विस सुरू आहे. ज्यात युजर्संना चांगली स्पीड सोबत जास्त डेटा मिळू शकतो. रिलायन्स जिओ नंतर ४ जी सर्विस सेवेत क्रांती आली आहे. वोडाफोन आयडियाने गेल्या वर्षा बेंगळुरू आणि मुंबई सारख्या शहरात ३ जी सिम सेवा बंद केलेली आहे. आता दिल्लीत ही सेवा बंद केली जाणार आहे. २ जी व्हाइस कॉलिंग सर्विस जारी राहणार आहे. वोडाफोन-आयडियाने ४जी कस्टमरवर कंपनीने घोषणा केली आहे. तर २जी कस्टमर व्हाइस कॉलिंगची सुविधा घेवू शकतात. परंतु, जुन्या सिम कार्डवर इंटरनेटची मजा घेवू शकत नाही. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या माहितीनुसार, दिल्ली सर्कल मध्ये वोडाफोन आयडियाचे १ कोटी ६२ लाख हून जास्त सब्सक्राइबर्स आहेत. यात जितकी ३ जी युजर्स आहेत. त्यांना १५ जानेवारी पर्यंत आपले सिम ४ जी मध्ये पोर्ट करावे लागणार आहे.