महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि.३ जानेवारी – भारतीय स्मार्टफोन कंपनी लावाकडून भारतीय टेक बाजारात पुन्हा एकदा नव्याने प्रवेश केला जात आहे. कंपनीने मागील आठवडय़ात बीइयु स्मार्टफोन लाँच केला होता. सध्या नवीन वर्षामध्ये नवीन स्मार्टफोन ग्राहकांच्या भेटीला आणण्याची तयारी कंपनी करीत आहे. यासाठी नवीन वर्षातील 7 जानेवारीच्या कार्यक्रमात नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.
लावाने सोशल मीडियावर लाँचिंग कार्यक्रमासह कंपनी आपले नवीन स्मार्टफोन दाखल करणार आहे. हा इवेंट दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. सदर कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रीमिंग कंपनीच्या फेसबुक पेज आणि युटय़ूब चॅनेलवर ग्राहकांना पाहता येणार असल्याची माहिती कंपनीने ट्वीटच्या आधारे दिली आहे.
लावा बीइयु अगोदरच लाँच कंपनीने आपला लावा बीइयु स्मार्टफोन या अगोदरच दाखल केला असून त्याला चांगला प्रतिसाद असल्याचे सांगण्यात आले.