महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि.३ जानेवारी -‘सिनोफार्म’ या चिनी सरकारी कंपनीकडून पाकिस्तान 11 लाख कोरोना प्रतिबंधक लसीच्या डोसची खरेदी करणार आहे. पाकच्या आरोग्य मंत्र्याने यासंदर्भात माहिती दिली आहे.
सिनोफार्मची लस तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत 79.34 टक्के प्रभावी असल्याचा तसेच लसीच्या अँटिबॉडीजचा पॉझिटिव्ह रूपांतरण दर 99.52 टक्के असल्याचा दावा कंपनीने केला होता. सर्व निष्कर्षाअंती चीनने या लसीच्या वापराला सशर्त परवानगी दिली आहे.
कर्जबाजारी पाकिस्तान मात्र, इतर देशांकडून लस खरेदी न करता चीनच्या या लसीचे 11 लाख डोस खरेदी करणार आहे. पाक मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.