महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी -पि.के.महाजन.- दि. ४ जानेवारी – अंध अपंग विकास असोसिएशन मध्ये दरवर्षी प्रमाणे लुई ब्रेल संस्थेचे अध्यक्ष स्वर्ग वासी दिनकर रामचंद्र गायकवाड यांच्या प्रतिमेस अलोक प्रदीप गायकवाड यांच्या शुभ हस्ते हार अर्पण करून व केक कापून पुढील कार्यक्रम संपन्न झाला.
लुई ब्रेल यांच्या लिपीमुळे अंध लोकांना अंधारातून उजेडात येण्यासाठी ब्रेल लिपी शिक्षणाची मदत झाली त्या निमित्त दरवर्षी संस्थेत लुई ब्रेल जयंती साजरी करण्यात येते कार्यक्रमास संस्थेचे सेक्रेटरी स्मिता दिनकर गायकवाड , नरेंद्र निकाळजे , दत्ता रोकडे , कारण रोकडे , शुभम पवार , मंदा प्रदीप गायकवाड , उर्मिला ओहाळ रुक्मिणी अंध व अपंग बांधव ह्या कार्यक्रमास उपस्थित होते