महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ५ जानेवारी – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास 18 जानेवारीपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. नियमित विद्यार्थी त्याचबरोबर पुनर्परीक्षार्थी, खासगी, श्रेणीसुधार योजनेद्वारे परीक्षेस बसू इच्छिणारे विद्यार्थी नियमित परीक्षा शुल्क भरून या मुदतीपर्यंत परीक्षा अर्ज भरू शकतात.
सुरुवातीला परीक्षा अर्ज भरण्याची मुदत 4 जानेवारीपर्यंत होती, मात्र शिक्षण मंडळाने यात वाढ करून ती 18 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थी www.mahahsscboard.in या वेबसाईटवरून परीक्षाअर्ज करू शकतात. या मुदतीनंतर अर्ज भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देणार नाही, अशा सूचना राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिल्या आहेत.