महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ५ जानेवारी – कोरोनाचा संकटकाळ अद्याप संपलेला नसताना देशातली पाच राज्य बर्ड फ्लूच्या संकटात सापडली आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब , हिमाचल प्रदेश आणि केरळमध्ये बर्ड फ्लूचा धोका वाढलाय.. बिहार, झारखंड आणि उत्तराखंड राज्य सरकारने अलर्ट जाहीर केलाय… खबरदारीचा उपाय म्हणून हिमाचलप्रदेशात मासे, कोंबडी, आणि अंडविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान 425 हून अधिक कावळे, बगळे आणि इतर पक्षांचा यामुळे मृत्यू झालाय. झालावडच्या पक्ष्यांना नमुना घेण्यासाठी भोपाळमध्ये राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थानात पाठवण्यात आलंय. इतर जिल्ह्यांमध्ये झालेल्या चाचण्यांच्या नमुन्यांचे अहवाल अजून आले नाहीयत.
गेल्यावर्षी जानेवारीच्या शेवटापर्यंत एक लाखाहून अधिक पक्षी इथे आले होते. यावर्षी 50 वर्षांपेक्षा कमी पक्षी पोहोचलेयत. बर्ड फ्लूच्या निर्देशांनुसार मृत पक्षांची विल्हेवाट लावण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. केरळमध्ये परिस्थिती नियंत्रणात असताना देखील हाय अलर्ट जाहीर करण्यात आले. केरळमध्ये 2016 मध्ये मोठ्या प्रमाणात बर्ड फ्लू पसरला होता.