ब्रिटननंतर या देशातही लागू करण्यात आला लॉकडाऊन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ६ जानेवारी – ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे 2021 सालीही लॉकडाऊनसारखी परिस्थिती जगभरात निर्माण होण्याची शक्यता आहे. वेगाने परसणाऱ्या या विषाणुला रोखण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्याचबरोबर इतर देशांनीही आता लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याची ७ सिक्रेट्स
जर्मनीच्या चान्सलर एंजला मार्केल यांनीही देशात लॉकडाऊनची घोषणा केली. देशात जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत लॉकडाऊन असेल. हा कठोर निर्णय कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर प्रतिबंध लावण्यासाठी घेण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जर्मनीत 30 डिसेंबर, 2020 ला एका दिवशी एक हजारापेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. बुधवारी येथे 1,129 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जर्मनीमध्ये शाळा, ऑफीस इत्यादी सर्व बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याचबरोबर या देशांनी देखील लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

स्कॉटलंड – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या घोषणेनंतर इंग्लंडसह स्कॉटलंडमध्येही लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
नेदरलँड्स – नेदरलँड्सने कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका बघता डिसेंबरमध्येच लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. येथे 19 जानेवारीपर्यंत सर्व शाळा, अत्यावश्यक सामानांची दुकानं वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रिया – ऑस्ट्रियाने त्या घोषणेला परत घेतलं आहे, ज्याअंतर्गत कोरोना निगेटीव्ह रिपोर्टसोबत बाहेर निघू शकता. येथे 24 जानेवारीपर्यंत सर्व शाळा, अत्यावश्यक सामानांची दुकानं वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे.
पोलंड – पोलंडने 28 डिसेंबरपासून लॉकडाऊनची घोषणा केली आहे. याअंतर्गत शॉपिंग सेंटर बंद रहातील आणि फिरण्यावरही निर्बंध असतील.
कोलंबिया – कोलंबियाने आपली राजधानी राजधानी बागोतामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे कोलंबियाच्या शहरांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
झिम्बाब्वे – झिम्बाब्वेमध्येही कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अर्थव्यवस्था ढासळत असल्याने झिम्बाब्वेची परिस्थिती वाईट आहे. अशा परिस्थितीत कोरोनापासून वाचण्यासाठी दुसऱ्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *