पाकिस्तान ला लोळवत टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंडने पहिल्यांदाच केला हा विश्वविक्रम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ६ जानेवारी – न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये (New Zealand vs Pakistan) इनिंग आणि 176 रनने विजय मिळवला. याचसोबत न्यूझीलंडने या सीरिजवरही 2-0ने कब्जा केला. पाकिस्तानविरुद्धच्या या विजयामुळे न्यूझीलंडची टीम पहिल्यांदाच आयसीसी टेस्ट क्रमवारीत (ICC Test Ranking) पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. केन विलियमसन (Kane Williamson) याच्या नेतृत्वात खेळणारी न्यूझीलंडच्या टीमने टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अव्वल स्थान पटकावलं आहे. योगायोग म्हणजे केन विलियमसन हा देखील टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावरच आहे.

आयसीसी टेस्ट क्रमवारीत न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत 118 रेटिंगसह अव्वल स्थान गाठलं आहे, तर ऑस्ट्रेलिया आता 116 रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आणि भारत 114 पॉईंट्ससह तिसऱ्या, इंग्लंड 106 पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे.

या यादीमध्ये 82 रेटिंग असणारी पाकिस्तान सातव्या क्रमांकावर आहे. याआधी 5 जानेवारीला आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीत ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर होती. या यादीत पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका, सहाव्या क्रमांकावर श्रीलंका, आठव्या क्रमांकावर वेस्ट इंडिज, नवव्या क्रमांकावर बांगलादेश आणि दहाव्या क्रमांकावर झिम्बाब्वेची टीम आहे.

न्यूझीलंडने दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 6 विकेट गमावून 659 रन केले होते. त्याआधी पाकिस्तानची पहिली इनिंग फक्त 297 रनवर संपुष्टात आली होती. दुसऱ्या इनिंगमध्ये पाकिस्तानचा 186 रनवर ऑल आऊट झाल्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला.

या मॅचमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन याने 238 रनची शानदार खेळी केली केली. केन विलियमसन याला मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं. तर काईल जेमिनसन याने पहिल्या इनिंगमध्ये 5 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 6 विकेट घेतल्या, त्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅच देण्यात आलं. याआधी पहिल्या टेस्टमध्ये न्यूझीलंडने पाकिस्तानचा 101 रनने पराभव केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *