महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी -पि.के.महाजन – दि. ६ जानेवारी – आज सहा जानेवारी पत्रकार दिन चिरायू होवो…कारण पत्रकारीते शिवाय लोकशाही पुर्ण होऊ शकत नाही. पत्रकाराची लेखणीने सत्य मार्गाने लिहले तर तलवारी पेक्षा तिचा धाक जास्त बसतो…परंतु सध्या मोजकेच पत्रकार सोडले तर पत्रकारीतेचे बाजारीकरण झाले , पत्रकार विकावू झाले आहेत अस धडधडीत म्हटल जातं. खरच पत्रकार पत्रकारीता तत्वहीन झालीय का? पत्रकारीतेत स्पर्धा निर्माण झाल्यामुळे पत्रकारीता जनहिताच्या व राष्ट्रहिताच्या भुमिके पासून लांब जात आहे का?
डिजीटल मिडीया मुळे पत्रकारीतेवर विकासात्मक परीणांम होता हेत का? पत्रकाराची विश्वासर्हता दिवसेंदिवस कमी कमी होत चालली का? ….ह्या सर्व प्रश्नांची शाहनिशा करण्यासाठी , लोक शाही मजबूत करण्यासाठी पत्रकारीतेत काही सुधारणा होण्याच्यासाठी देशपातळीवर व नंतर राज्य पातळीवर परीषद घेवून उहापोह करण्याची गरज आहे जेणेकरून करून पत्रकारां मध्ये जागृती निर्माण होईल. पत्रकारीतेचे महत्व पत्रकारांना अधीक समजले तर ते तत्व धरून काम करतील. कारण पत्रकारचे कार्य हे सिमेवरच्या जवान प्रमाणेच देशासाठी महत्व पुर्ण आहे. देशाच्या तटबंदी च्या सुरक्षा इतकेच देशातील न्याय व्यवस्था व कायदा सु व्यवस्था सुरक्षित राहण्यासाठी पत्रकारीता आपले कार्य करीत असते. पत्रकाराला भूक तहान विसरून प्रसंगी जिव धोक्यात घालून काम करावे लागते. जनते समोर सत्य मांडत असताना समाजातील दृष्ट प्रवृत्तींकडून जिवाला धोका पत्करावा लागतो.म्हणून पत्रकारीतेला कोणी कितीही नावे ठेवली तरी पत्रकारीतेवरच लोकशाही जिवंत आहे हे नाकारता येणार नाही..