सावधान ! बनावट Co-WIN अ‍ॅपपासून राहा सावध, नाहीतर होईल मोठं नुकसान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ७ जानेवारी – केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harsh Vardhan) यांनी बुधवारी लोकांना Co-WIN अ‍ॅपच्या नावाखाली कोणतंही बनावट Mobile App डाऊनलोड करणे आणि त्यावर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करण्याबाबत सावध केले आहे. असे कोणतेही काम न करण्याचा इशारा त्यांनी नागरिकांना दिला आहे. सरकारकडून याबाबत एक ट्वीट करण्यात आले आहे. या ट्टीटनुसार गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर Co-WIN अ‍ॅपच्या नावाशी मिळते जुळते अनेक अ‍ॅप उपलब्ध झाले आहेत. जे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारू शकतात. काही अ‍ॅप्स असे देखील आहेत, जे 10 हजारपेक्षा अधिक जणांनी डाऊनलोड देखील केले आहे. यामुळे ग्राहकांचे मोठे नुकसान होऊ शकते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केलं ट्वीट
सरकारचे अधिकृत प्लॅटफॉर्म असणाऱ्या अ‍ॅपच्या नावाप्रमाणेच असणारे #CoWIN नावाचे अ‍ॅप तयार करण्यात आले आहेत. हे अ‍ॅप्स डाऊनलोड करू नका किवा त्यावर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका- अशा आशयाचे ट्वीट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ट्विटरवरून करण्यात आले आहे.

सरकारच्या माहितीनुसार, 13 जानेवारीपासून देशभरात कोव्हिड 19 च्या लसीकरणास (COVID-19 Vaccination) सुरुवात होऊ शकते. दरम्यान या लसीकरणाबाबत सर्व माहिती CoWIN अ‍ॅपवर उपलब्ध करण्यात येईल, लवकरच हे अ‍ॅप डाऊनलोड केले जाईल. या अ‍ॅपच्या माध्यमातून कोरोना व्हॅक्सिनसाठी फ्री रजिस्ट्रेशन करू शकता. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर पूर्णपणे फ्री असेल आणि युजर्स अत्यंत सोप्या पद्धतीने हे अ‍ॅप डाऊनलोड करू शकतात. अद्याप गुगल प्ले स्टोअर किंवा अन्य कोणत्या प्ले स्टोअरवर हे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले नाही आहे.

CoWIN अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करावे लागेल. यानंतर आवश्यक माहिती टाकून तुमचं नाव रजिस्टर करता येईल. रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यासारखे ओळखपत्र द्यावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *