महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ७ जानेवारी – ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण सामन्याच्या चौथ्या षटकाच्या तिस-या चेंडूवर ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. सिराजने डेव्हीड वॉर्नरला बाद केले. त्यानंतर पुकोवस्की आणि लॅबुशेन यांनी संघाचा डाव सावरला. पण ३५ व्या षटकात नवदीप सैनीने धोकादायक ठरत असलेल्या पुकोवस्कीला माघारी धाडले आणि ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २ बाद १०६ अशी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यजमान ऑस्ट्रेलियाने ५५ षटकांत २ बाद १६६ धावा केल्या. यावेळी लॅबुशेन नाबाद ६७ धावा (१४९ चेंडू), आणि स्टीव्ह स्मिथ नाबाद ३१ धावांवर (६४ चेंडू) खेळत होते.
लॅबुशेन आणि स्मिथची अर्धशतकी भागिदारी ; पुकोवस्की बाद झाल्यानंतर स्टीव स्मिथसह लॅबुशेन याने संघाचा धावफलक सतत हलता ठेवला. दोघांनी ४८ व्या षटकांत ५० धावांची भागिदारी पूर्ण केली.
मार्नस लॅबुशेनचे अर्धशतक…वील पुकोवस्की बाद झाल्यानंतर स्टीव स्मिथ मैदानात उतरला. त्याने लॅबुशेनला चांगली साथ दिली. लॅबुशेनही अर्धशतक झळकावले. त्याने १०८ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या.
पुकोवस्कीचे अर्धशतक…
कसोटी क्रिकेटमद्ये प्रदार्पण करणा-या पुकोवस्की याने अनुभवी डेव्हीड वॉर्नर सोबत संघाच्या डावाची सुरुवात केली. पण वॉर्नर लवकर बाद झाला. संघाला हा मोठा धक्का होता. त्यानंतर नवख्या पुकोवस्कीवर दबाव वाढल्याचे स्पष्ट दिसत होते. अशात त्याने लॅबुशेन सोबत टीच्चून फलंदाजी केली आणि कसोटी कार्किर्दीतील पहिले अर्थशतक झळकावले. तसेच चहापानापर्यंत दोघांनी संघाची धावसंख्या ३१ षटकांत १ बाद ९३ धावांपर्यंत पोहचली. यावेळी पुकोवस्की १०० चेंडूत ५४ धावा (४ चौकार) आणि लॅबुशेन ७८ चेंडूत ३४ धावांवर (५ चौकार) खेळत होते.
डेव्हीड वॉर्नर बाद..दुखापतीतून सावरलेला डेव्हीड वॉर्नर आणि विलो पुकोव्हस्की सलामीसाठी मैदानात उतरले. मात्र, डावाच्या सुरुवातीलाच चौथ्या षटकाच्या तिस-या चेंडूवर यजमान संघाला पहिला धक्का बसला. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने वॉर्नरला अवघ्या ५ धावांवर (८ चेंडू) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. चेतेश्वर पुजाराने त्याचा झेल पकडला. त्यानंतर मार्नस लबुशेन मैदानात उतरला.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलिया ५५ षटकांत २ बाद १६६ धावा
५० षटकांत २ बाद १६१ धावा
दरम्यान, तिसरा कसोटी सामना जिंकून अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गावसकर-बोर्डर चषक आपल्याकडेच ठेवण्याचा प्रयत्न करेल. याशिवाय दुसर्या कसोटीत शानदार विजय मिळविल्याने व संघात ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा समावेश झाल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास बळावला आहे. तर दुसर्या कसोटीत स्वीकारावा लागलेला पराभव बाजूला ठेवून ऑस्ट्रेलियन संघ तिसर्या कसोटीत कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करेल.
विल पुकोवस्कीने ऑस्ट्रेलिया संघाकडून कसोटी पदार्पण केले आहे. तर भारताकडून वेगवान गोलंदाज नवदिप सैनीने कसोटीची ब्लू कॅप परिधान करून मैदान मारण्याची जिद्द बाळगली आहे. जखमी उमेश यादवच्या स्थानी सैनीला संघात संधी मिळाली आहे.