महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ८ जानेवारी -देशात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरवाढीचा भडका उडाला. पेट्रोल 24 पैशांनी तर डिझेल 29 पैशांनी महागले. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा प्रतिलिटर भाव 90 रुपये 83 पैसे तर डिझेलचा भाव 81 रुपये 07 पैसे इतका झाला आहे. दिल्लीत पेट्रोलच्या किमतीने आणि मुंबईत डिझेलच्या किमतीने विक्रमी पातळी गाठली आहे. या दरवाढीमुळे देशभर महागाई वाढण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल पंपन्यांनी बुधवारी पेट्रोलच्या किमतीत 26 पैसे प्रतिलिटर आणि डिझेलच्या किमतीत 25 पैसे प्रतिलिटर अशी दरवाढ केली होती. देशात 29 दिवस पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर होत्या. बुधवारपासून या किमतीत वाढ होऊ लागली. राजधानी दिल्लीत गुरुवारी तेल विपणन पंपन्यांच्या मूल्य अधिसूचनेला अनुसरून पेट्रोलच्या किमतीत 23 पैसे प्रतिलिटर आणि डिझेलच्या किमतीत 26 पैसे प्रतिलिटर अशी वाढ करण्यात आली.